Posts

Showing posts from May, 2022

जेम्स वेब: अवकाश दुर्बीण (Space Telescope)

Image
      नमस्कार मित्रांनो. आजचा हा माझा पहिलाच ब्लॉग. आज मी तुम्हाला जेम्स वेब या अत्याधुनिक स्पेस टेलिस्कोपबद्दल सांगणार आहे.            अमेरिकेच्या नासाची जेम्स वेब टेलिस्कोप ही  नासाच्याच हबल स्पेस टेलिस्कोपची उत्तराधिकारी म्हणता येईल. कार्य आणि क्षमतेच्या बाबतीत आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत मात्र जेम्स वेब खूपच प्रगत आहे.  जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप    जेम्स  वेब या साठच्या दशकात नासाचे प्रशासक असलेल्या व्यक्तीचे  नाव या टेलिस्कोपला दिले आहे. JWST(जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप)  ही दुर्बीण नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी यांनी संयुक्तपणे तयार केलीय. २५ डिसेंबर २०२१ रोजी या तेलीस्कोप्ने अवकाशात झेप घेतली आणि काही दिवसांतच या दुर्बिणीने अवकाशातील टिपलेली काही छायाचित्रे नासाने प्रकाशित केली.         जेम्स वेब स्पेस टेलीस्कोप ही एक इन्फ्रारेड वेधशाळा आहे जी Ariane 5 रॉकेटने 25 डिसेंबर 2021 रोजी फ्रेंच गयाना येथील कौरो येथून प्रक्षेपित केली आहे. ही जगातील सर्वा...